+91 771 905 1515

official.ugamfoundation@gmail.com

सौ.अंजली जाधव यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी – मा.श्री.मनोजदादा घोरपडे


News Today Marathi-एक कदम सच्चाई की ओर  Date : 7-7-2023


भारतीय जनता पार्टी, कराड उत्तर मतदारसंघाच्या महिला मोर्चा अध्यक्ष आणि उगम फाउंडेशन च्या संस्थापिका सौ.अंजली विकास जाधव यांचे वाढदिवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र,नागठाणे येथे आयोजित सर्व रोग निदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मा.श्री.मनोजदादा घोरपडे यांनी अंजली ताईंच्या सामाजिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढले.

याप्रसंगी बोलताना वर्धन अॅग्रो चेअरमन मा.श्री.धैर्यशीलदादा कदम यांनी मानवी आरोग्याचे महत्व सांगून अंजली ताईंना शुभेच्छा दिल्या. तसेच भाजपचे विशेष निमंत्रित सदस्य मा.श्री.रामकृष्ण वेताळ यांनी शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती देऊन मनोगत व्यक्त केले. कराड उत्तर भाजपचे अध्यक्ष मा.श्री.महेशबाबा जाधव यांनी आपल्या मनोगतातून सामाजिक कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी संचालक बाजार समिती कराड श्री.राजेंद्र चव्हाण, संचालक बाजार समिती, कोरेगाव श्री.आनंदराव जाधव, मा.पंचायत समिती सदस्या सौ.विजया गुरव, संचालक खटाव माण कारखाना श्री.युवराज साळुंखे, डॉ.आर सी चौगुले, डॉ.श्री.प्रभुणे, माजी संचालक अजिंक्यतारा कारखाना श्री.माधवराव सावकार, माजी सरपंच,निनाम श्री.जीवन जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र नागठाणेचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्री.झगाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

सर्व रोग तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी साई गणेश हॉस्पिटल आणि आशा सेविका यांचे विशेष सहकार्य लाभले. श्री शंकर शेजवळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक अंजली जाधव यांनी केले. आणि आभार प्रदर्शन श्री सागर ढाणे यांनी केले.